रथ सप्तमी 2024 | रथ सप्तमी पूजा विधी | Rathsaptami puja in marathi | Ratha Saptami pujan Vidhi In Marathi
रथ सप्तमी माघ महिन्याच्या हिंदू कॅलेंडरनुसार दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी रथ सप्तमी साजरी केली जाते.. हा दिवस सूर्य देवाला समर्पित असून या दिवशी सूर्य देवाची पूजा केली जाते. Ratha Saptami 2024
रथ सप्तमीला भानु सप्तमी आणि अचला सप्तमी असंही म्हटलं जातं. घरात सुख, समृद्धी आणि संपत्तीत वाढ व्हावी शिवाय निरोगी आयुष्यासाठी या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते. महाराष्ट्रात मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदीकुंकूवाचा समारंभाच आयोजन केलं जातं. यंदा महिलांना केव्हापर्यंत हळदीकुंकू समारंभ करता येणार आहे. तसंच रथसप्तमीची पूजा, शुभ मुहूर्त आणि पूजा मांडणीसाठी खालील व्हिडिओ पहा
रथसप्तमी पूजाविधी : रथसप्तमी हा अदिती आणि कश्यप यांचा पुत्र 'सूर्य' याचा हा जन्मदिवस आहे, असे मानले जाते. या दिवशी सूर्य पूजन केले जाते. सूर्य पूजन करण्यासाठी सूर्योदयापूर्वी स्नान करावे. छोट्या कलशातून सूर्याला अर्घ्य द्यावे. रथसप्तमीदिनी तुळशीपुढे सात घोड्यांच्या रथात स्वार झालेल्या सूर्यरथाचे चित्र काढून महिला त्याचे पूजन करतात. अंगणात दीप प्रज्वलन करून भाताचा नैवेद्य सूर्याला दाखविला जातो. सूर्यरथाला असणारे सप्त अश्व आठवड्यातील सात वार दर्शवतात. रथाची बारा चाके बारा राशींचे प्रतिक आहे, असे मानले जाते.
मुहूर्त : हिंदू कॅलेंडरनुसार, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी 15 फेब्रुवारीला 2024 सकाळी 10.12 वाजेपासून 16 फेब्रुवारी 2024 सकाळी 8.54 वाजेपर्यंत असणार आहे. सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवाची पूजा करावी असे सांगितले जाते आणि याच नियमाने रथ सप्तमी ही 16 फेब्रुवारी 2024 साजरी केली जाणार आहे.
सूर्यनारायणाची कहाणी | कहाणी आदित्यराणूबाईची | Ravivar Suryanaraynachi kahani |आदित्यराणूबाईची कहाणी
0 comments: