दिवाळी 2022 मध्ये सूर्यग्रहण असल्याने लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीपूजन विसर्जन कधी करावे संपूर्ण माहिती

दिवाळी 2022 मध्ये सूर्यग्रहण असल्याने लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीपूजन विसर्जन कधी करावे संपूर्ण माहिती


दिवाळी हिंदू धर्माचा एक मुख्य सण आहे. हिंदू धर्मात दिवाळीचे विशेष महत्व आहे. धनतेरस पासून भाऊ बीज पर्यंत जवळ जवळ 5 दिवसापर्यंत चालणारा दिवाळी हा सण  देशभर साजरा केला जातो. दिवाळीला दीप उत्सव ही म्हटले जाते. कारण दिवाळीचा अर्थ दिव्यांचे प्रज्वलन! अंधःकारातून प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी.
दिवाळीच्या दिवशी सर्वत्र दिव्यांच्या प्रकाशाने देश उजळून निघतो. सर्व धर्माचे लोक दिवाळी आनंदाने साजरी करतात. या दिवशी माता लक्ष्मी आपल्या भक्तांच्या घरी जाऊन त्यांना सुख समृद्धीचा आशीर्वाद देते, असे मानले जाते 
तर, दिवाळीच्या दिवशी रावणावर विजय मिळवून भगवान श्रीराम 14 वर्षाचा वनवास करून अयोध्येत परतले होते असे म्हटले जाते. त्यामुळे दिवाळी दिवशी संपूर्ण अयोध्या दिव्यांनी सजविली जाते. हा दिवस लोक दिवे, मिठाई आणि लक्ष्मी पूजन करून साजरा करतात.
दिवाळी हा सण कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जातो. यंदा दिवाळीच्या पर्वात सुर्यग्रहण असल्याने दिवाळीच्या तारखेबाबत काहीसा गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे दिवाळी नेमकी कधी साजरी करावी असा प्रश्न सर्वांना पडला आहे.





लोकपरंपरेनुसार लोक दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजनाची पूजा विसर्जित करतात , मात्र, यावेळी दिवाळी पूजेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 ऑक्टोबरला खंडग्रास सूर्यग्रहण असल्याने दुसऱ्या दिवशी सूर्यग्रहणाच्या सुतकापूर्वी लक्ष्मीजींना पूजा विसर्जित करावी लागणार आहे 
सकाळी 4.15 पासून सुतक खंडग्रास सूर्यग्रहण दुपारी २.२८ पासून संपूर्ण जगात सुरू होईल. ग्रहणाची मध्य वेळ संध्याकाळी 4.30 वाजता असेल, तर ग्रहणाची समाप्ती संध्याकाळी 6.32 वाजता होईल. ग्रहणाबद्दल बोलायचे झाले तर ग्रहणाचा कालावधी ४ तास ३० मिनिटांचा असेल. या अर्थाने दिवाळी 24 ऑक्टोबरला आणि खंडग्रास सूर्यग्रहण 25 ऑक्टोबरला होणार आहे.
दिवाळी कार्तिक कृष्ण पक्षातील अमावास्येला असेल. शास्त्रानुसार सूर्यास्तानंतर होणारे सूर्यग्रहण फारसे प्रभावी नसते. असं असलं तरी हे ग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे दिवाळीला होणाऱ्या लक्ष्मीपूजनावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.

0 comments: