सुगड पूजा कशी करावी | sugad puja kashi karavi | सुगड पूजन कसे करावे व त्याचे महत्व

संक्रांतीला सुगड पूजा कसे करावे व त्याचे महत्व


मकर संक्रांत हा पौष महिन्यातील सौभाग्यवती स्त्रीयाचा अतिशय महत्त्वाचा सण आहे , संक्रांतीला घरोघरी  सुगडाची पूजा केली जाते,'
बोळक्याची (सुगड) पूजा करून आपल्या संसारासाठी सुख संपती, धन-धान्य कधी कमी पडू नये म्हणून देवाजवळ मागणे करतात.

पूजेसाठी ५ बोळकी (सुगड), २ पणती, नवा पांढरा दोरा, हळद-कुंकू, नवीन कपडा, तीळ-गुळ, ऊस, गाजर, गव्हाच्या ओंब्या, मटार-हरभरे दाणे, बोर व ताम्हन, दिवा व अगरबत्ती घ्यावी.

काळ्या आणि लाल  रंगाच्या मातीच्या सुगडांची पूजा या दिवशी करतात. 
पूजा करावव्याच्या बोळक्यांना  सुगड का म्हणतात? 
सुगड हा शब्द खरेत तर अपभ्रंश होऊन आला आहे. 'सुघट' हा खरा शब्द आहे 
सुघट या शब्दाचा हा अपभ्रंश आहे. 'सुघट' म्हणजे सुघटीत असा घड. या घड्यात शेतात बहरलेलं नवं धान्य ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे. 
लहान सुगड  मोठ्या सुगडावर ठेवतात   आणि पूजा देवघरात मांडून त्यांची पूजा केली जाते. धनधान्याचं प्रतिक म्हणून त्यात हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ हे साहित्य भरलं जातं.

सुगडाची पुजा पाटावर मांडून त्यावर केली जाते. पाटाभोवती छान रांगोळी काढली जाते. पाटावर लाल  रंगाचे वस्त्र टाकून  त्यावर तांदूळ पसरावे आणि  त्यावर सुगड मांडावे.पूजा मांडल्यानंतर त्याचा बाजूला दिवा लावावा.
सुगड मांडण्याआधी सुगडावर  पाच चुन्याच्या आणि  हळद-कुंकू ओलं करून त्याच्या उभ्या रेषा लावून सजवावे.  त्यानंतर त्याच्या तोंडाला पाच फेर धरून दोरा गुंडाळावा  . हिवाळ्यात येणारी किमान ५ धान्य हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ, हळद, कुंकू, गव्हाच्या लोंब्या हे सर्व साहित्य सुगडात घालावे. वरती एक पणती ठेवावी.  हे अन्यत्र काळं मोठं सुगड खाली त्यावर लाल सुगड ठेवून दोन्हीत वाण भरतात. सुगडावर अक्षता, फुलं, हळद, कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा. तिळाचे लाडू आणि हलव्याचा नैवेद्य दाखवावा.
 यातील एक सुगड देवासमोर आणि एक सुगड तुळशीजवळ ठेवलं जातं. त्यानंतर किमान पाच सवाष्णींना वाण देतात. या दिवशी हळदीकुंकू समारंभ करुन तीळगूळ वाटतात. तुम्ही मकर संक्रांत ते रथसप्तमीपर्यंत हळदीकुंकू समारंभ करु शकता.



0 comments: