फेसबुक आभासी जग…अवास्तवातून वास्तवतेकडे….
पक्ष्यांना स्वछंदी फिरण्यासाठी ,भिरभिरण्यासाठी आभाळ आहे….तर देवानेच म्हणाव (झुक्याभाऊने…)आपल्याला स्वछंदी भिरभिरण्यासाठीच हे आभासी जग बनवल आहे …इथे स्वतःची स्वतंत्र घर बनवून आपल्याला हव तस मनसोक्त ,हव ते जगता येत,स्वताःचे छंद जपता येतात अन् हवे तितके व्यक्तही होता येत….या आभासी जगात स्वताःच्या आयुष्याची दोरी स्वतःच्या हातात ठेऊन मनसोक्त विहार जगात करुच शकतो.मग ह्या पेक्षा स्वछंदी जगणं काय असू शकत….???
पण…..रोजच्या आयुष्यातली गर्दी विसरुन ह्या आभासी जगात जरा विसावा घ्यावा तर, इथेही अनोळखी ओळखीचे होतात….ओळख ,मैञी,मग….मैञीच नात सोडून भावनीक जवळीक अन् मग त्या नात्याला प्रेमाच नाव देऊन बसतात.जी गर्दी सोडून इकडे आलो तीच इकडेही गर्दी स्वतःभोवती करुन स्वतःच अस्तित्व हरवून पुन्हा एकदा एकटेपणाच्या गर्द छायेत स्वतःला घेऊन जातात.
खरतर आयुष्यभर सोबत राहूनही माणसांचा स्वभाव कळत नाही,माणस ओळखता येत नाही अन् इथे एखाद्याला न पहाता, न भेटता,नुसते बोलून कसे काय ओळखू शकतो..??शब्दांचे खेळ तर सगळेच खेळतात..शब्दाचा अर्थ घेऊ तसा निघतो….पण कुणी छान लिहीत असेल तर त्या व्यक्तीचे शब्द भावतात,आपलेसे करतात ,अगदी मनात घरही करतात.पण मग ते त्या व्यक्तीने लिहीलेल आपल्यासाठीच लिहील आहे किंवा कुणासाठी लिहील हा प्रश्न मुळातच नसतोच…कारण लिहीणारा हा आपल्या कल्पनेप्रमाणे सुचेल तसे लिहित असतो.आपण वाचक म्हणून त्या शब्दांचा,लिहीण्याचा आदर,कौतूक करु शकतो..त्या व्यक्तीच्या अगदी शब्दांशी मैञीही करु शकतो….पण ही मैञी करता करता…त्या मैञीला प्रेमाच नाव देऊन ती मैञी गढूळ का बर करावे??अन् मग ते नात निभावता नाही आल कि एकमेंकाना दोष देत बसतात.हे कितपत योग्य आहे??
आभासी जगात प्रत्येकाच्या मानसिक,भावनिक,शाब्दिक गरजा पुर्ण होऊही शकतात..पण शेवटी त्याला इकडे मर्यादा आहे.कारण इथल्या प्रत्येकाला प्रत्येकाच खाजगी आयुष्य आहे.जबाबदार्या आहेत..अन् त्या सोडणं कधीच शक्य नाही.कारण कधीही वास्तवात जगणं हिताच ठरतं.बहुतकरुन बरेच लोक विवाहीत आहेत तरिही ऐकमेकांच्या प्रेमात पडून ऐकमेकांना भावनिक गुंतवून,शब्दांचे खेळ करुन भावनिकता वाढवून स्वतःलाच विसरुन जाणं सर्रास या आभासी जागात चाललेल दिसत आहे.
एखाद्याबद्दल प्रेम वाटण,असणं,ते प्रेम व्यक्त करण खुप सोप आहे.पण हे आभासी जग आहे…नुसता आभासच सभोवताली असतो…इथल्या मर्यादा वाढवू शकत नाही…अन् त्यामुळे ते प्रेम निभावण्यासही बंधने निर्माण होतात.
कारण…आपल खरं आयुष्य अन् आभासी आयुष्य यांचा ताळमेळ घालण कठीण होत जात…अन् ऐकाचवेळी “दोन प्रेमाची नाती”संभाळणही कठीण असत…त्यातल्या त्यात जर कुणी ती नाती संभाळण्यात यशस्वी झालाच तर दोन्हीपैकी एका नात्यावर अन्यायच होतो.निर्माण झालेल नात निभावता नाही आल तर ती फसवणूक नाही होऊ शकत..कारण इथे व्यक्ती बदलण्याची, सोडून जाण्याची ,न बोलण्याची कारणंही आहेत……आणि अर्थात ती कारणे अगदी खरीपण आहेत.कारण दोघांनीही एकमेंकात बुडून जाऊन ,भावनांच्या आहारी जाऊन इतके ऐकमेंकात गुंतले तर ऐकमेंकाशिवाय जगणं कठीण होईल..याच भान एकाला तरी ठेवायला हवच ना…??नाहीतर प्रवाहासोबत वहावत गेल तर शेवटी बुडणंच होत..ही एक बाजू झाली…
दुसरी बाजू जरी 100% गुंतून नात निभावण्याचा प्रयन्त केला तरी आपल्या व्ययक्तिक कुंटुंबाच काय???पुरुष असो वा स्ञी घर,मुल,बायको,नवरा,आईवडील ,त्याच्या जबाबदार्या आहेतच की…त्या सोडून सतत या आभासी जागात पडीक राहून ऐकमेंकाना पुर्ण वेळ देणं अशक्य आहे…इथे commitment पाळणं म्हणजे तारेवरची कसरतच.आणि कुणाला आपल्या बद्दल कळाल तर नावाची भितीही मनात रहातेच.कारण इथे प्रत्येकालाच सुरक्षित रहायच असतं…छान व्यक्तीमहत्त्व म्हणून तग धरायचा असतो.
मग …..कुणाच्यातरी विरहात जळत बसण्यापेक्षा आपल्या भविष्याचा,वर्तमानाचा विचार करावा ना…आयुष्य एकदाच तर मिळत..ते काय रडत रडत जगण्यासाठी का??इकडे नाही पटल ,आवडल तर एक ब्लॉक बटणवर क्लिक केल की ती व्यक्ती दिसेनाशी होती…मग आपणच का आपल्या मनावर शरिरावर ,विचारावर परिणाम करुन शब्दांना…..विरहात उतराव??
खरतर एक लक्षात घ्यायला हवं…ह्या आभासी जगात लाखो करोडो लोक आहेत…तरीही आपण इतके ओळखीचे कसे काय झालो…..काहीतरी आपले ऋणानूबंध आहेत हा असा विचार करुन इकडे भेटलेला सगळा मिञ परीवार जपायला हवा.उगिच कुणाच्या कवितेच्या ,शब्दांच्या सौंदर्याच्या,बोलण्याच्या प्रेमात पडून आपल छान स्वछंदी आयुष्य का दुषित करायचे??
प्रेम हे असच सहज मिळणारी गोष्ट नाहीये अन् आभासात राहून प्रेम आहे म्हणण्यातही अर्थ नाही.म्हणूनच मैञीच नात जोडा ,मनापासून जपा पण थोडस अंतंर ठेऊनच…स्वतःचा आरसाटा कुणाला न घेऊन देता..आणि कुणाचा आरसाठा न घेता.कारण इकडे सगळेच “आपले” वाटणारे खरे नसतात…स्वतःपेक्षा कुणावरच विश्वास ठेऊ नका.
आपल्या आयुष्यातील आपल्याशी समोरासमोर प्रत्यक्ष बोलणारीच माणसे आपला “वर्तमान” आहे हे मनाला ठाम समजवायला पाहीजे.अन् मनाने ते मान्यही करायला पाहीजे.तरच ह्या आभासी जगात आपण खंबिरपणे उभा राहू शकतो.नाहीतर उगिच कुणाचा आधार शोधून त्या व्यक्तीवर अवलंबून राहून स्वतःचा कुमकुतपणा कश्याला तो दाखवायचा….??
“जियो जिंदगी अपनी मर्जी से”…..हे ब्रिद आपल्या आयुष्याच असायलाच हवयं.. आपल्याला हवे तसे…आपल्या पद्धतीने….आपले छंद जोपासत…आपल्या अंतरीच्या शब्दांना,कल्पनांना स्वतःसाठी मार्ग काढून व्यक्त व्हाव…हा इथे आभासी जगात भरपूर छान व्यक्ती आहेत अन् भेटतातही ,तर त्यांची मैञी जपा..त्यांना आपल सर्वस्व नका बनवू… कारण त्या व्यक्तीलाही खुप अवघड जात आणि आपल्यालाही हे लक्षात घेऊन……वाटचाल करा.
झुक्याभाऊने निर्माण केलेल्या विश्वात स्वछंदी फुलपाखरासारखे उडा…..अन् जगण्याचा सुंदर आयुष्याचा आंनद घ्या.
स्पंदन@सोनाली कुलकर्णी
7 march 2017
0 comments: